‘नारी मज बहु असती | परि प्रीति तुजवरती |’
श्रीकृष्णाच्या सर्व पत्नी सौंदर्याच्या व गुणांच्या खाणी होत्या. कशा एकीपेक्षा एक सरस होत्या. फुलाच्या उपमासुद्धा त्यांच्या मुलायम कांतीला कमीच पडतील. रत्नांचे तेज, मोत्यांचे पाणी, दवबिंदूचा तजेला, सरितेची अवखळता, सागराची गंभिरता, गगनाची विशालता, पृथ्वीची उदारता व विद्युलतेची चपलता यांचा सुरेख मिलाफ म्हणजे श्रीकृष्णाच्या सुवर्ण किरीटांत चपखल बसलेली अष्टपैलू स्त्रीरत्नेच होती.......